Our Mission
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य. यानुसार समाजातील भल्यांचे रक्षण करण्याबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्तीची पाळेमुळे शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे. कोणतेही भय न बाळगता व कोणत्याही पक्षपाताशिवाय कायद्याचे राज्य चालविण्यासाठी, तसेच या देशाच्या कायद्याची निःपक्षपातीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. समाजाच्या निकोप समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल व भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे आमचे ध्येय आहे.
सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे , गुन्ह्यांना प्रतिबंध व त्यांचा तपास करणे, संघटित गुन्हे व असामाजिक तत्वे यांचे विरोधात कठोर कारवाई करणे, जातीय सलोखा कायम राखणे, इत्यादी कामांसाठी सातारा पोलीस दल सदैव तत्पर राहील.
सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी देखील प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे व कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण सातारा जिल्ह्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात निश्चितपणे यशस्वी होऊ याची मला खात्री आहे.
श्री.समीर शेख , (भा.पो.से.)
पोलीस अधीक्षक, सातारा.