भरोसा सेल
About Us
भरोसा सेल हे महिला सहायता कक्ष, जेष्ठ नागरिक कक्ष , बाल विशेष पथक या तीन घटकांसाठी एकच मध्यवर्ती केंद्र असून सदर केंद्रामधून वरील सर्व घटकांना पोलीस मदत, समुपदेशन, मानसोपचार, वैद्यकीय सेवा, विधी सेवा, संरक्षण अधिकारी अशा विविध सेवा पुरविण्यात येतात.
महिला सहाय्यक कक्ष
समाविष्ट सेवा
- पोलीस मदत
- महिला हेल्पलाईन
- समुपदेशन
- वैद्यकीय सेवा
- विधीविषयक सेवा
- मानसोपचार तज्ञ्
- पिडीत महिलांचे पुनर्वसन
- कौटुंबिक हिंसाचार कायद्या अंतर्गत संरक्षण
फायदे
पिडीत महिलांसाठी पोलीस, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ञ्, समुपदेशक, विधीतज्ञ, संरक्षण अधिकारी व पुनर्वसन या सेवांच्या माध्यमातून तात्काळ सहाय्य / आधार देऊन त्यांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडविणेस मदत होईल. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारास बळी पडलेल्या महिलांना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ देता येईल.
कार्यपद्धती
- भरोसा सेल मध्ये सर्व प्रकारचे सहाय्य एकाच ठिकाणी मिळवून देण्याकरिता वरील सर्व सेवा उपलब्ध आहेत. भरोसा सेल हे पिडीत महिलांच्या तक्रारी स्विकारणेकरिता २४ * ७ सुरु असून महिला हेल्पलाईन नं. १०९१, तसेच ११२ नंबर वर येणाऱ्या तक्रारदारांच्या तक्रारी स्विकारून संबधित तज्ञांकडे पाठविणेत येतात.
- पिडीत महिलांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे वर्गीकरण करून त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करणेत येते.
- पिडीत महिलेला समुपदेशन करून आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणेत येते.
- भरोसा सेल मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी मधील पिडीत व्यक्तीस न्याय मिळत नाही तो पर्यंत तक्रार बंद करून कुठलाही एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही.
विशेष बालपथक
समाविष्ट सेवा
- पिडीत बालकांना मानसिक बळ व आधार देणे.
- विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन करणे.
- पिडीत बालकांना तात्काळ वैद्यकीय सेवा /मानसोपचार तज्ञ / विधीतज्ञ संरक्षण अधिकारी व पुनर्वसन इत्यादी सेवा पुरविणे.
- विधी संघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करणे तसेच वारंवार समुपदेशन करणे.
- गुन्हेगारी वातावरणापासून बालकांना दूर ठेवणेकरिता योजना राबविणे.
- बालकांच्या ह्क्कांचे संरक्षण करणे.
- चाईल्ड हेल्पलाईन नं १०९८ तसेच ११२ नंबर वर येणाऱ्या तक्रारदारांच्या तक्रारी स्विकारून संबधित तज्ञांकडे पाठविणे.
जेष्ठ नागरिक कक्ष
समाविष्ट सेवा
- जेष्ठ नागरिक कक्षामध्ये त्यांचे तक्रारी अर्ज स्विकारून तात्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जाते.
- जेष्ठ नागरिक कक्षाकडून भरोसा सेलच्या माध्यमातून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. जेष्ट नागरिक संघाचे/एन जी ओ चे सहकार्य घेतले जाते.
- जेष्ठ नागरिकांना व गैरअर्जदारांना समुपदेशन करून योग्य ते मार्गदर्शन केले जाते.
- जेष्ठ नागरिकांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले असून त्यांना ओळखपत्रेही देणेत येतात.
- पोलीस ठाणे स्तरावर जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी नेमलेल्या नोडल अधिकारी यांचेशी समन्वय राखणे.
- जेष्ठ नागरिक हेल्पलाईन नंबर १०९० तसेच ११२ नंबर वर येणाऱ्या तक्रारदारांच्या तक्रारी स्विकारून संबंधित तज्ञांकडे पाठविणे.