Initiatives
निर्भया पथक
सातारा जिल्हयातील एकूण 6 विशेष निर्भया पथकांतील पोलीस दिदीं मार्फत शाळा व महाविद्यालयातील मुलींशी संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेवुन त्यांच्या समस्येचे निराकरण करतात हेतु - १. दृष्यमान पोलीसींग २. शाळा/ महाविद्यालया बाहेर दंगा, हुल्लडबाजी, टवाळ खोरपणे वागणा-या मुलांना कायद्याचा धाक दाखवुन जरब बसविणे. ३. महाविद्यालयाच्या परिसरातील गर्दी करुन उभ्या राहणा-या घोळक्यावर, तसेच महाविद्यालये सुटल्यानंतर जाणे-येण्याच्या रस्त्यावर पेट्रोलिंग करुन हुल्लडबाजी करणा-या मुलांवर प्रतिबंधक कारवाई केली जाते. ...Read More
सातारा जिल्हा महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचा उद्देश १. सातारा जिल्हयामध्ये महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करणे. २.महिला अत्याचार विरोधी कायदयांची जनजागृती व त्याची जरब बसविणे. ३.प्रत्येक वयोगटातील मुले / महिला यांचा पोलीसांप्रती विश्वास वाढविणे. ...Read More
पोलीस काका / पोलीस दीदी
पोलीस काका / पोलीस दीदी 1. शाळा/महाविद्यालयीन मुला/मुलींना गुड टच/वाईट टच, लैंगिक शोषण आणि महिलांबाबत विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले जाते. 2. प्रत्येक पोलीस ठाण्यात 2 ते 3 पोलीस दीदींची विशेष नियुक्ती असते. 3. मुला-मुलींना कायद्याचे ज्ञान मिळण्यास मदत होते. 4. लैंगिक शोषण कसे होऊ शकते याची माहिती आम्हाला मिळत आहे. 5. पोलिसांबद्दलची भीती कमी होऊन पोलिसांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन वाढला आहे. ...Read More
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प समारोप कार्यक्रम
स्वसंरक्षण प्रशिक्षण सातारा जिल्हा महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पान्वये सातारा जिल्हयातील 11 तालूक्यांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये 50 शाळांमध्ये 13 प्रशिक्षक व पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांच्या मदतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. १. एकुण 4361 विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले आहे. २. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. ३. पोलीसांविषयीची भिती कमी होवुन पोलीसांप्रती सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झालेला आहे. ...Read More
पोलीस बँड, सातारा.
पोलीस बँड, सातारा. पोलीस विभाग विवाह समारंभ, इतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि समारंभ परेड यांसारख्या विशेष प्रसंगी पोलीस बँड पथकाची सुविधा देखील प्रदान करते. लग्नाच्या निमित्ताने किमान २ तास बुक करणे अनिवार्य आहे. (अ) पोलीस अधिकाऱ्यासाठी = रु.७,०००/- (ब) पोलिसांसाठी = रु. ५,०००/- (C) खाजगी नागरिकांसाठी = रु. १२,०००/- ...Read More
पोलीस जिम, सातारा.
चैतन्य जिम, सातारा. आरोग्य जपण्यासाठी पोलीस कल्याण विभागाने चैतन्य जीम सुरू केली आहे. नागरिकांच्या अर्थसंकल्पात नवीन मंजूर दर जाहीर केले जातात. (अ) प्रवेश शुल्क: रु. ५०/- (ब) पोलीस अधिकारी/पोलीस पुरुषांसाठी: रु. २००/- प्रति महिना. (क) खाजगी नागरिकांसाठी: रु. ३५०/- दरमहा. (डी) स्टीम बाथ (१५मिनिटांसाठी): रु.१००/-. ...Read More
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, मैत्री नेटवर्क निर्माण संस्था पुणे, भरोसा सेल, सातारा पोलीस व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
दिनांक 31 मार्च 2022 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, मैत्री नेटवर्क निर्माण संस्था पुणे, भरोसा सेल, सातारा पोलीस व आमचे यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात बालकांवर व महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार: संकल्पना, कायद्यातील तरतुदी व सामाजिक संस्थांची संबंधित घटनांबाबत असणारी भूमिका व जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, मा. प्रवीण भिर्डे, दिवाणी न्यायाधीश, सातारा, मा. अजयकुमार बंसल, पोलीस अधिक्षक,सातारा, मा. भाई शैलेंद्र माने, कार्याध्यक्ष, भा.भ.वि.वि. संस्था, सातारा व महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ.शाली जोसेफ हे उपस्थित होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून मा. प्रवीण भिर्डे साहेब तसेच मा. अनीता आमंदे मेनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल, सातारा, मा. जान्हवी जोशी, पॅनल विधिज्ञ, सातारा व मा. संभाजी पाटील, रिटायर्ड पोलीस उपअधीक्षक, सातारा हे उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सर्वसाधारण 100 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते त्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागाचे संरक्षण अधिकारी, जिल्ह्यातील विविध समुपदेशन केंद्रातील समुपदेशक, तसेच सरपंच, महिला बचत गटातील सदस्य, युवक मंडळातील कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, भरोसा सेल साताऱ्याचे कर्मचारी व आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक हे उपस्थित होते. ...Read More